तो मालकाच्या तिजोरीकडे वळलेला आहे
माईक सत्याचा आवाज नाही
तो सौद्याची पावती बनला आहे
काल जो प्रश्न विचारायचा सत्तेला
तो आज स्क्रिप्ट वाचतो आहे
शाई विकली गेली आहे
कागद गहाण पडला आहे
रक्त वाहतंय रस्त्यावर
पण ब्रेकिंग न्यूजमध्ये
सेलिब्रिटीचा कुत्रा हरवलाय
लोकशाही चौथा स्तंभ म्हणे
पण हा स्तंभ आता
सत्तेच्या पायाशी
लोटांगण घालतोय!
जे बोलले ते देशद्रोही
ज्यांनी प्रश्न विचारले ते अर्बन नक्षल
अन् जे गप्प बसले
तेच “वरिष्ठ संपादक”!
तरीही…
एखादा तरी पत्रकार अजून जिवंत आहे
जो भीक न मागता प्रश्न विचारतो आहे
जो दलालीपेक्षा ही
अंतरात्म्याला मोठं मानतो आहे
त्यांच्यासाठी ही फक्त एक कविता आहे
अन् त्या दलालांसाठी एक इशारा आहे
- विलास खैरनार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा