राजकीय लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती – एक विद्रोही हाक

- विलास खैरनार 

भारतीय संविधान लिहून झाले तेव्हा देशाचा व भवितव्याच्या डोळ्यांत आशेचा तेजोमय प्रकाश होता. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चार मशाली हातात घेऊन नव्या राष्ट्रानं प्रवास सुरू केला.
पण आज प्रश्न असा आहे, आपण त्या मशाली पेटवून ठेवतोय की त्यांच्या सावलीत अंधारच वाढवत आहोत?
संविधान म्हणतं “सर्वांना समान अधिकार” पण जमिनीवर अजूनही माणूस जातीवर मोजला जातो, धर्मावर तोलला जातो, पैशावर विकला जातो.
हा कोणता न्याय? हा कोणता विकास?

आजही एखादी मुलगी शिक्षणासाठी लढते, एखादा तरुण नोकरीसाठी धावतो, गरीब न्यायासाठी भटकतो…
आणि वरचे लोक संविधानाचे तख्त धारण करून फक्त भाषणं देत राहतात. संविधान समानता शिकवतं, समाज मात्र अजूनही भेदभावाच्या घाणेरड्या जाळ्यात गुदमरतो.
संविधानानं आवाज दिला, पण आज आवाज उठला की त्याला “देशद्रोही” असा शिक्का मिळतो. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या मागे नोटिसा धावतात. विद्यार्थी बोलले तर त्यांना आंदोलनात गुन्हेगार बनवलं जातं.
लेखक-कलावंत यांनी मत मांडले की त्यांच्यावर सोशल मीडिया तलवारी उगारतो. स्वातंत्र्य देणारं संविधान जिवंत आहे, पण आवाज दाबण्याची प्रवृत्ती त्याच्यावर धूळ टाकत आहे.

भारताचा आत्मा विविधतेत आहे. पण आज धर्मांच्या नावावर द्वेष पेरला जातो, भीती विकली जाते, आणि श्रद्धेच्या आडून सत्तेचा व्यापार केला जातो. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचं शील आहे, पण आज तिचं अपहरण करून तिला राजकीय सभांमध्ये ढोल - ताशे फिरवले जातात.
धर्म जितका मोठा केला तितका माणूस लहान होत जातो आणि हाच विद्रोहाचा क्षण आहे. संविधानानं सत्ता मर्यादित ठेवली. पण आज सत्तेला मर्यादा नाहीत,
उलट लोकशाहीला मर्यादा लावल्या जातात. सत्तेत बसलेले लोक टीका ऐकू इच्छित नाहीत, विरोधकांना शत्रू मानतात, आणि प्रशासनाला स्वतःच्या हातातली बाहुली बनवतात. न्यायालय, माध्यम, संसद ज्या संस्थांनी लोकशाही सांभाळायची, त्यांना कमकुवत करण्याची स्पर्धा दिसते. संविधान संस्था मजबूत करायला सांगतं; सत्ता मात्र संस्थांना वाकवायला धडपडते. पण हा देश फक्त शासकांच्या हातात नाही, तो प्रत्येक नागरिकाच्या विवेकात आहे. तरीही आपणच लोकशाहीला जखमा देतो,
धोका कुणाकडूनच नव्हे, कधी कधी आपल्या शांततेतूनही वाढतो.

संविधान अजूनही शक्तिशाली आहे, पण त्याची अंमलबजावणी कमजोर. समाजात वाढणारा अन्याय,
राजकारणात वाढणारी दुटप्पीपणा, सत्तेच्या अहंकारात हरवलेली जबाबदारी, लोकांच्या विचारांवर वाढणारे ध्रुवीकरण हे सगळं या महान दस्तावेजाच्या पायावर घाव घालणारं आहे. विद्रोह म्हणजे हिंसा नाही, विद्रोह म्हणजे प्रश्न विचारणं, अन्यायाला “नाही” म्हणणं, संविधानातल्या मूल्यांना पुन्हा प्रज्वलित करणं. कारण शेवटी, संविधान जिवंत तेव्हाच राहील, जेव्हा आपण जागृत राहू.



गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

इंदुरीकरांच्या कीर्तनशैलीचा गाजावाजा आणि आज उभा राहिलेला आरसा

- विलास खैरनार 

इंदुरीकर महाराज लोकप्रिय झाले ते त्यांच्या नवीन पद्धतीच्या कीर्तनशैलीमुळे. त्यांच्या अगोदरही अनेक कीर्तनकार झाले, पण अशा विनोदी भरलेल्या, जोरदार अभिनयाने सजलेल्या, कधी-कधी टोकाच्या टीकेने रंगलेल्या शैलीत कोणी बोलले नव्हते. ‘कॉमेडी कीर्तन’ हा शब्द कानावर पडायला लागला तो यांच्यामुळेच.पण त्यांच्या उपरोधिक टिप्पणींच्या धडाक्यात स्त्रियांविषयी अनेकदा कमीपणाची, हीन मानसिकतेची टीका ऐकू येत गेली, हेही तितकेच खरं. व्यसनाधीन युवकांवर त्यांनी झडर घातला, ते योग्यच; पण अनेक मुद्द्यांवर त्यांची विचारसरणी मध्ययुगीनच वाटत असे. असो, विषय तो नाही. प्रश्न आहे त्यांच्या अलीकडील निर्णयाचा आणि त्यामागच्या दिलेल्या कारणाचा. अचानक ते म्हणाले "आता मी कीर्तन करणार नाही, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, कीर्तन करावं की करू नये. पण लोकांना मी घोडे लावलेत!" ही भाषा? आणि ही पद्धत कितपत योग्य?

वर्षानुवर्षे ते कीर्तनात सांगत आले, मुलींनी गॉगल लावू नये, मेकअप नको, वराती मध्ये नाच नको, खर्चिक लग्नं करू नयेत, गाडी-घोड्यांची मिरवणूक नको, मेनू साधा असावा, उधळपट्टी टाळा, लोक त्यावर टाळ्या पिटत, हसत, दाद देत.पण त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला मात्र, मोठा दिमाख, स्टाईलिश एंट्री, गॉगल, मेकअप, नाच, समारंभात भरपूर खर्च, आणि सगळे तेच "थेर" ज्यावर ते स्वतः वर्षानुवर्षे टीका करत आले. त्यांच्या मुलीला सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, हे साऱ्यांचंच मत आहे. पण तेच उपदेश करत राहणारे स्वतःला मात्र अपवाद समजून कसं चालणार?

ते सांगत होते की, वऱ्हाडी जमिनीवर बसले,वाढपी वारकरी पोशाखात, महिला पारंपरिक वेशात त्यांचे हे मुद्दे छानच आहेत पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले उपदेश त्यांनीच पाळले की नाही? त्यांनीच सांगितलं होतं “जेवण साधं असावं! एक लापशी, आमटी-भात पुरेसा!” पण त्यांच्या कार्यक्रमात? यादी पाहिली की त्यांचेच भाषण आठवतं. ज्यावर त्यांनी कडाडून टीका केली. 

लोकांवर उपदेश करणाऱ्यांचे आचरण अधिक कसोशीने तपासले जाते हेच इंदुरीकर महाराज विसरले. लोकांना चार गोष्टी सुनावणारा माणूस जेव्हा स्वतःच उलट वागतो, तेव्हा प्रतिक्रिया येणारच. लोकांनी चूक दाखवली म्हणून त्यांच्यावर तेच नाराजी, त्रागा आणि "घोडे लावलेत!" अस बोलतात. ही भाषा आणि हा पवित्रा कीर्तनकारांना शोभणारा नाही. उपदेश करणारा स्वतः पाळत नसला तर त्याचा उपदेश तोंडाची वाफ ठरतो आणि हेच आज दिसलं. उपदेश एक आणि वर्तन दुसरे असेल तर तो दांभिकपणा ठरतो. संत परंपरेच्या नावाने बोलणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला नको का?

कीर्तन ही परंपरा म्हणजे फक्त विनोद, टिंगल, टाळ्या नव्हे, ती संस्कृती, प्रबोधन, विचार आणि नैतिकतेची साधना आहे.
“कीर्तन तेथेच, जिथे हिताचा संदेश असतो
आणि जिथे कीर्तन करावं तेथे अन्नाचा मोह नसावा" 
असे तुकाराम महाराज म्हणतात. ही मापदंडे आजचे सर्व कीर्तनकार पाळतात का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

इंदुरीकर महाराज जे काही होते आणि आजच्या परिस्थितीत तफावत दिसते म्हणूनच लोकांनी त्यांना आरसा दाखवला. हे स्वीकारणं कठीण जरी वाटलं तरी तेच योग्य आहे. प्रसिद्ध व्यक्ती कितीही मोठी असली तरी उपदेश करताना आणि आचरणात तफावत असेल तर समाज माफ करत नाही.

बुधवार, १९ मार्च, २०२५

नागपूरात झालेल्या दंगलीचे जबाबदार कोण ?

  - विलास खैरनार

नागपूरमध्ये पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा खेळ सुरू झालाय! आणि हा खेळ खेळणारे काही ठराविक लोकच आहेत - जेवढं रक्त सांडेल, तितकं त्यांच्या राजकीय स्वार्थाला खतपाणी मिळतं. औरंगजेबच्या नावाने आंदोलन करून बाबा ताजुद्दीन यांच्या चादरीचा अपमान करणारे हे कोण? आणि का? ह्यांचा उद्देश काय? धार्मिक भावना दुखावून, समाजात विष पसरवणं हाच काय "संस्कृती रक्षणाचा" मार्ग उरलाय का?


ही नागपूरची संस्कृती आहे का? महाल भाग म्हणजे नागपूरचं हृदय, आणि त्यात हे द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय! आज हे सुरू झालंय, उद्या तिथं आणखी काही पेटवलं जाईल. हे लोक कोणत्याही एका धर्माचे हितचिंतक नाहीत - ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी, लोकांच्या भावना विकण्याचं काम करतायत. नागपूरकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, ही आग आपल्या दारात लावली जातेय, आणि तिच्या ज्वाळा वाढतील तेव्हा हे सगळे "संस्कृती रक्षक" लांब पळतील! त्यांना ना इथल्या हिंदूंचा खरा फायदा करायचा आहे, ना मुसलमानांचा -त्यांना फक्त सत्ता हवी आहे! आता नागपूरचं सामाजिक शांतता वाचवायची की हे सगळं शांत पाहायचं, हा निर्णय नागपूरकरांनी घ्यावा!

चोरांचे सरकार आहे ... दंगलखोरांचे सरकार आहे
आमदार चोरले
जनमत चोरले
पक्ष चोरले
न्याय चोरला
भ्रष्टाचाराच्या फायली दाखवत , तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन, विरोधी पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करुन आपल्यासोबत घ्यायचे आणि सत्तेत बसून सरकारी तिजोरी व मालमत्ता लुटायची हा खेळ दिवसाढवळ्या सुरु आहे .
जोपर्यंत बहुसंख्य निगरगट्ट आणि बावळट जनता सुधारणार नाही , कणखर विरोध दर्शविणार नाही तोपर्यंत हे असेच बघावे लागणार यात तिळमात्रही शंका नाही .

समाजात निर्माण होणाऱ्या दंगली, जातीय तेढ आणि हिंसाचार हे सहसा नियोजित आणि हेतुपूर्वक घडवले जातात. यामागे काही विशिष्ट गट, जात किंवा धर्म आपल्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. मराठा समाजाने अशा प्रकारच्या कटकारस्थानांना बळी न पडता, संयम आणि शहाणपणाने विचार करून पावले उचलली पाहिजेत.

मराठा समाज हा स्वाभिमानी असून, ऐतिहासिकदृष्ट्या समाजहितासाठी नेहमीच पुढे राहिला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांनी अशा हिंसाचारात न पडता, आपली ताकद संघटनेत आणि कायदेशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढण्यात खर्च केली पाहिजे.

या मुद्द्यावर काही ठळक बाबी:
1. दंगली हेतुपूर्वक घडविल्या जातात – काही विशिष्ट गट समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अशा घटना घडवतात.

2. मराठ्यांनी यामध्ये न पडणे हेच हिताचे – दंगलीत सामील झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

3. संघटित आणि शांततामय लढा अधिक प्रभावी – कायद्याच्या मार्गाने आणि राजकीय सामर्थ्याने प्रश्न सोडवता येतो.

4. आरक्षणविरोधी गट स्वतः सक्षम आहेत – त्यांना मराठ्यांकडून सहानुभूतीची गरज नाही.

अशा परिस्थितीत मराठा समाजाने आपले मुख्य उद्दिष्ट – आरक्षण आणि सामाजिक प्रगती – याकडे लक्ष केंद्रित करावे. समाजविघातक तत्वांपासून सावध राहून, आपल्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने लढणे हेच शहाणपणाचे ठरेल.

मातृभूमीच्या संरक्षणासाठी ज्यांनी पिढ्यान पिढ्या घातल्या त्यांना धर्माचे संवर्धन, संरक्षण करण्याची चांगली समज आहे.

"३१८ वर्षांपूर्वी मेलेल्या औरंगजेबावर राजकारण करणार्‍यांसाठी काही विचार"

औरंगजेब १७०७ साली मेला. या गोष्टीला ३१८ वर्ष झाले पुढे त्याच्या मृत्यूनंतर भारत बदलला, पुढे अनेक साम्राज्ये आली आणि गेली, शेवटी देश स्वतंत्र झाला. पण २०२५ मध्येही जर काही लोक औरंगजेबाच्या नावावर समाजात तेढ निर्माण करत असतील, तर त्यांनी स्वतःच्या राजकीय अपयशावर विचार केला पाहिजे.

विकासाचा मुद्दा टाळण्यासाठी इतिहासाची धूळ उकरून काढणाऱ्या नेत्यांना काही प्रश्न:

महागाईवर उपाययोजना आहेत का?
तरुणांना नोकऱ्या देण्याची योजना आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का?
रस्ते, पाणी, वीज यावर लक्ष दिलं का?
देशाला औरंगजेबाच्या भुताची नाही, तर उत्तम आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेची गरज आहे!
राजकारण विकासावर करा, इतिहासावर नव्हे!

सर्व धर्मीयांनी एकत्र या आणि षडयंत्र मोडून काढा .
मनुवाद्या॑चे कुटील कारस्थान संपवा आणि शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवा .

रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

महायुतीमध्ये बंडखोरी होणार...!


- विलास खैरनार

भाजपच्या १०५ आमदारांना माहिती आहे , पार दिल्लीत बसलेल्या मोदी शहाणा पण माहिती आहे भाजपवाले सध्या शिंदेंना ढिल देत आहेत, कारण विधानसभेत पराभव झाल्यावर त्याचे सगळं खापर शिंदेंच्या डोक्यावर टाकायचं आणि हळूच शिंदेंच्या कानात सांगायचं तुमचा उपयोग आता संपला आहे आता तुम्ही बाजूला व्हा,
जोपर्यंत एखाद्याचा उपयोग आहे तोपर्यंत भाजप त्याला खांद्यावर घेऊन मिरवतो आणि एकदा का उपयोग संपला की त्याचा किरीट सोमय्या करून कचऱ्याच्या डब्यात टाकतो,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे मुख्यमंत्री पद आलं तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते असे म्हणाले की आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहे याचा अर्थ असा होतो की आता जरी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला देवेंद्र फडणीसच मुख्यमंत्री हवेत देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावं लागतंय हे अजून त्यांना अडीच वर्षानंतर सुद्धा पचत नाहीये,
शिंदे यांचे सहकारी मंत्री जे व्यवहार करतात तेही आरएसएसला मंजूर नाही अनेक घोटाळ्यांमध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची नावे घेतली जातात, तशी भाजपाच्या मंत्र्यांची येऊ नये अशी ताकीद आरएसएस नेत्यांनी भाजपला दिलेली आहे म्हणजे यावरून आरएसएसच्या नेत्यांचं शिंदे बद्दल काय मत आहे ते बघा पण भारतीय जनता पक्ष काही गप्प बसलेला नाहीये शिंदेंच्या प्रत्येक कृतीवर त्यांची नजर आहे आणि शिंदे जर अतिरेक करत असतील शिंदे जर भाजपवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या फुग्यातली हवा कशी काढायची हे भाजपच्या नेत्यांना बरोबर माहिती आहे,
अमित शहा शिंदेंना ढील देता याचं कारण शिंदेंचे आमदार वाढणं आणि उद्धव ठाकरे यांना मात देणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पण शिंदे जर भाजपवर कुरगुडी करू लागले तर फडणवीस काय कोणीही ते मान्य करणार नाही,
त्यामुळे माझ्या मते एक तर भाजप योग्य वेळी शिंदेना धडा शिकवणार आहे, तुमचा उपयोग आम्हाला झालेला आहे आम्ही तो केलेला आहे आता तो संपलेला आहे आता तुम्ही बाजूला व्हा असा योग्य वेळी ते शिंदेंना सांगणार आहे आणि ती योग्य वेळ लवकरच येणार आहे अगदी निवडणुकीच्या आधी येणार आहे की निवडणुकीच्या नंतर येणारे एवढाच प्रश्न आहे.
निवडणुकीच्या नंतर जर महायुती हरली तर शिंदेंचा एकच उपयोग आहे की अपयशाची जबाबदारी शिंदे यांच्या डोक्यावर टाकता येईल जबाबदारी घेण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांची नाही अमित शहांची नाही आणि तुम्हाला गंमत सांगतो नितीन गडकरींकडे ही विचारणा करण्यात आली नितीन गडकरींचाही अंदाज घेण्यात आला की ते भाजपचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र तेथील कामगिरी नितीन गडकरींनी पूर्णपणे का झटकून टाकलेली आहे. कारण नितीन गडकरींना माहिती आता महाराष्ट्रात जाणं म्हणजे पायावर धोंडं पाडून घेणं आहे, त्यामुळे नितीन गडकरी जबाबदारी घ्यायला तयार नाही फडणवीसांकडे जबाबदारी नाही, त्यामुळे जर पराभव व्हायचा असेल तर तो शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे नेते असताना व्हावा असं भाजपाला वाटतंय म्हणजे सगळा दोष त्यांच्या आणि अजित पवार यांच्या गळ्यात टाकता येईल हे सरळ सरळ गणित आहे जर शिंदेला ३० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भाजपच्या दृष्टीने त्यांचा थोडाफार महत्त्व राहील.
तीस पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मात्र भाजप त्याला बाजूला करायला किंवा त्यांच्या ताकदी एवढी त्यांना तेवढेच त्यांना महत्त्व द्यायला कमी करणार नाही हे लक्षात घ्या ही परिस्थिती आहे. त्यामुळे मी म्हणतोय की योग्य वेळी भाजप म्हणजे अमित शहा शिंदेंची विकेट काढल्याशिवाय राहणार नाहीत, भाजप असा हिशोब करतोय की जर समजा भाजप म्हणजे अगदी ६० - ७० जागा भाजपला मिळाल्याच तर भाजप नंबर एक राहील. भाजपच मोठा भाऊ राहील त्यामुळे आपण जे सांगू आपण जो आदेश देऊ तो शिंदेंना ऐकावा लागेल आणि योग्य वेळी बाजूला व्हावे लागेल,
भविष्यात महायुतीमध्ये बंडखोरी होणार आहे, अजित पवारांच्या डोक्यालाही चिंता नाही कारण त्यांचे जे बंडखोर आहेत ते थेट शरद पवारकडे जाऊन शरद पवारांचं काम करू शकतात अजूनही अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत तळागाळाचे हे शरद पवारांना आपला नेताच मानतात ते शरद पवारांना वेगळं मानत नाहीत त्यामुळे अनेक जण त्यांना अजित पवारांकडे तिकीट मिळणार नाहीये ते शरद पवान कडे जातात त्यामुळे बंडकरीची चिंता अजित पवारांना नाहीये, बंडखोरीची चिंता सध्या तरी भाजपला मोठ्या प्रमाणात आहे, भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात बंडखोरी करतील यात शक्यच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठ्या धक्का बसेल.

महाराष्ट्राचे राजकारण

 

                                    



-
विलास खैरनार
          सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोठा बदल होताना दिसत आहे, कारण २०१९ मध्ये जर आपण बघितलं तर भाजप स्वत: च्या हिंमतीवर उभा होता पण पाच वर्षात आजचा महाराष्ट्र आपण बघतोय तर राजकारणाची भाजपची आजची परिस्थिती वेगळी आहे.
       स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून कशी घेता येते हे कळण्यासाठी काँग्रेसला साठ वर्ष लागले आणि हेच भाजपने दोन दशकात करून दाखवले. देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाची संपूर्ण ताकद असताना सुद्धा भाजपची आताची जी काय अवस्था झालेली आहे ती विरोधकांनी केलेली नाही ही त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक अन्य कोणत्याही पक्षांपेक्षा भाजपासाठी अवघड जाणार आहे.
       भाजपवाले दिल्लीत बसून महाराष्ट्राचे राजकारण चालण्याचा प्रयत्न करत होते पण हा प्रयन्त त्यांचा फसला आहे हे दिसत आहे. पक्ष ताकदीवरती याला फोडायला घ्या त्याला फोडायला घ्या, पण तुम्ही तुमच्या पक्षातील नेत्यांच्या ज्या काही भावभावना आहेत त्या समजून घेतल्यात हे महत्त्वाचे आहे. 2019 ला 105 जागा मिळाल्यामुळे भाजपाला जो प्रचंड गर्व तयार झाला, त्याच्यामुळे शिवसेना फोडली आणि नंतर अजित पवार फोडले तिथून सुरू झाला सर्व खेळ, शिवसेना आणि भाजपची युती असतांना भाजप नेहमीच मोठ्या भावाची भूमिका निभावत होता. मग ते हिंदू राष्ट्रासाठी असेल किंवा भाजप सरकारचे स्थैर्यासाठी असेल नंतर भाजपाने जे फोडा फोडीचे राजकारण सुरु केले आणि भाजपात जो बदल होत गेला त्यामुळेच मित्र पक्ष प्रचंड दुखावलेला आहे तो म्हणजे शिवसेना, आता त्याची युती नाही तो भाग वेगळा आहे.
      काँग्रेसचे काय करायचं राष्ट्रवादीचं काय करायचं यापेक्षा भाजपकडे आता समोर आव्हान आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काय करायचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले पण त्यांचा मोठेपणा काकांच्या मुळे हे नाकारताना येत नाही.
महाराष्ट्रात सध्या विकासाचे कामं कमी आणि पक्ष अंतर्गत मतभेद जास्त दिसताय अजून हि वेळ गेली नाही आता तरी नेत्यांनी लोकांची मानसिकता ओळखून घेतली पाहिजे

सरकार संवेदन शुन्य झाले का ?






            

 - विलास खैरनार 

     शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची जी जखम महाराष्ट्राला झाली, त्याबद्दलचे वेगवेगळे पैलू ऐकून घेणारा ऐकून घेतल्यापण आता ज्या घटना घडलेल्या आहेत त्या काही ना काही घटना घडतात सोमवारी दुपारी एक वाजता शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा कोलमडून पडला आणि त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या भावनांचा दर्शन महाराष्ट्रात होतं
        महाराष्ट्र संतापलेला आहे महाराष्ट्र चिडलेला आहे महाराष्ट्र दुखावलेला आहे, घडलेल्या सगळ्यात नवी घटना म्हणजे मुख्यमंत्री यांनी जवळजवळ 96 तासानंतर का होईना शिवाजी महाराजांचा हा पुतळा अवघ्या नऊ महिन्यात पडल्याबद्दल आज जाहीर दिलगिरी व्यक्त केली त्यांनी जाहीर माफी मागितली
         खरंतर एकदाथ शिंदेंनी हे पूर्वीच करायला पाहिजे परंतु राजकारणाच्या सगळ्या गदारोळामध्ये त्यांच्या हे लक्षात आलं नाही किंवा ते इतके निर्बल झाले आहेत की महाराजांचा पुतळा पडला की आपण काय प्रतिक्रिया द्यायला पाहिजे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि नेहमीच्या पद्धतीने त्यांनी आरेला कारे करणे सुरू केलं आणि सगळ्या गोंधळ झाला तुमच्या लक्षात असेल मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या जबाबदारीचा भाग न राहता पुतळा पडला याचा सगळा दोष हा वेगवान वाऱ्यावर ढकलेला होता आहे, पुतळा का पडला कशामुळे पडला याचा शोध न घेता मुख्यमंत्र्यावरच्या पदावरच्या माणसाने अशा प्रकारे काहीही बेजबाबदारपणे जाहीर करणं हे राज्यकर्त्याला साधेच नाही ते त्यांनी केलं
       त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वाऱ्याला दोष दिला आता जवळजवळ चार दिवसानंतर या सगळ्यांचे डोकं ठिकाणावर आले, पक्षाच्या पक्ष श्रेष्ठींनी या सर्वांचे कान ओढलेले आहे ते लक्षात घ्या जोपर्यंत दिल्लीहून आदेश येत नव्हता हे काहीच करत नाहीत तेव्हा तोपर्यंत जोपर्यंत वरतून काही सांगितलं जात नाही तोपर्यंत त्यांची डोकी चालत नाही अशातला प्रकार आहे बाकी नाही.
      खरंतर शिवाजी महाराज एवढे मोठे दैवत आहे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इजा झाली की आपण काय करायला पाहिजे काय मलमपट्टी करायला पाहिजे काय जनतेच्या भावनांवर उपचार करायला पाहिजेत हेही यांना कळलं नाही सरकार इतके संवेदन शुन्य झाले का ?
     राज्यकर्त्यांनी माफी मागितली तरी सुद्धा ही माफी प्रामाणिक आहे असं महाराष्ट्रातली जनता मानेल असं मला वाटत नाही मला स्वतःलाही ही माफी प्रामाणिक वाटत नाही. आधीच खर्च केलेले करोड रुपये हे जनतेचे पैसे आहेत ते पूर्णपणे फुकट घालवले, यांना काहीही वाटत नाही. एवढा निगरगट्टपणा संवेदन शुल्यता यातून रोजच दिसतेय, रोज ही संवेदन शुन्नता दिसते तरी महाराष्ट्रातल्या जनतेचे मन शांत होणार नाही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रक्षण जे करू शकत नाही ते माफी कसली मागतात, त्यांनी तर सत्तेतून राजीनामा द्यायला हवा बस.

बदलापूर बलात्काराचे राजकीय वास्तव

        - विलास खैरनार 

     सत्ताधाऱ्यांनो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तुम्ही फक्त खुर्चीसाठी फोडा फोडेचे राजकारण केले, गृहमंत्री तुम्ही तर पूर्ण अपयशी ठरला आहात. तुम्ही आतापर्यंत फक्त आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे या पलीकडे काहीच नाही, अशा निर्लज्ज निष्क्रिय आणि बेकायदेशीर सरकार कडून काय अपेक्षा ठेवावी. आणि हो, आता लोकांनी खरंच बाहेर पडायला पाहिजे कारण महाराष्ट्राचा आता यु.पी. बिहार झालाय 
     बांगलादेशात जे काही चालले आहे त्याचे राजकीय भांडवल करणारे, आपल्या देशात राज्यात काय चालले आहे ते दिसत नाही का, कि फक्त हिंदू मुस्लिम करून राजकीय फायदा करून घेणार. जो तो आपापले मत कशी वाढतील ते बघतात.
    मी कोणत्याही पक्षाचा समर्थन करत नाही पण जे झालं ते सांगतोय, जर आज आंदोलन झालं नसत तर ती बातमी तिथेच दाबली गेली असती, वाईट याच वाटत की आज स्त्री मग ती कोणत्याही वयाची असो ती ना शाळेत, ना हॉस्पिटल , ना मंदिरात, ना रस्त्यावर कुठेच सुरक्षित नाही. 
    आंदोलनाशिवाय सामान्य जनतेला न्याय कधीच मिळत नाही आणि जे कोणी म्हणतात ना की शांततेचा आंदोलन करायचं, आंदोलन शांततेत झालं पण कोणीही दखल घेतली नाही म्हणून ते आंदोलन हिंसक झालं जर रेल्वे रोको झालं नसत तर आज ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राला कळलीच नसती आणि त्या दोन मुलींना न्याय मिळण्याची शक्यता नसती, अजून एक गोष्ट सांगतो जेव्हा रेल्वे रोको झाली तेव्हा एक एक्सप्रेस बदलापूर स्टेशन जवळ अडकली होती तेव्हा तिथे जवळ राहणाऱ्या रहिवासी यांनी त्यांना जेवण आणि पाणी देऊन त्यांची सेवा केली, आणि सत्ताधारी लाडकी बहिण योजनेचे ढोल वाजवत होते ,चुलीत घाला तुमच्या योजना जो पर्यंत अनाजीपंत सारखे मंत्री आपल्या महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत हे असेच चालू राहणार आहे.