बुधवार, १८ मार्च, २०२६

भक्तीचा डंका

मंदिरातील पुजारीनेच
दान पेटीवर डल्ला मारला
अन् देवाचा कोप म्हणत
गावभर डंका वाजवला

जिथे श्रद्धा नतमस्तक होती
तिथेच विश्वास लुटला गेला
देवाच्या नावाखाली
माणूसपणा हरवला गेला


देव तर शांत उभा होता
माणसाचा खेळ पाहत
पण सत्य मात्र कुजबुजत होतं
“पाप मंदिरात नाही,
ते माणसाच्या मनात होतं”

डंका वाजतो देवाच्या कोपाचा
पण कोप झाला कुणावर ?
दान पेटी लुटणाऱ्यावर की,
विश्वास ठेवणाऱ्यावर ?

शेवटी देव नाही रागावला
रागावली ती माणुसकी
कारण पुजाऱ्यानेच
श्रद्धेची केली चोरी
        - विलास खैरनार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा