तिने हळूच विचारलं,
“तू माझ्याव्यतिरिक्त
कधी कोणाच्या प्रेमात पडलास का?”
मी काहीच बोललो नाही…
फक्त तिच्याकडे पाहिलं,
नजरेला तिची नजर भिडली,
आणि ओठांवर अलगद हसू उमटलं.
मी म्हणालो,
“हो… पडलोय.”
क्षणभर ती कावरीबावरी झाली,
तिच्या डोळ्यांत प्रश्न उमटले,
ओठांवरची हसरी रेषा विरली…
आणि ती शांत झाली.
मी हळूच म्हणालो
“मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय…
कारण प्रत्येक पुस्तक उघडलं की,
त्यातली एखादी कथा
मला तुझीच आठवण करून देते.
प्रत्येक पात्रात
तुझं एखादं रूप दिसतं,
प्रत्येक शब्दामध्ये
तुझा आवाज ऐकू येतो…
आणि प्रत्येक कथा संपताना
एकच जाणवतं
मी पुस्तकांच्या प्रेमात पडलो असलो,
तरी त्या प्रत्येक कथेत
मी शोधत असतो…
तुलाच आणि फक्त तुलाच”
©️ विलास खैरनार
No comments:
Post a Comment