Tuesday, October 8, 2024

आरक्षण

 

"देव - इंद्रा" च्या दरबारी
म्हणे भरली सभा
आरक्षणाच्या मुद्दावर
बोलण्याची दिली सर्वांना मुभा

"
एक" जण उठला
मी म्हणे सर्वांचा "नाथ"
आंदोलकांवर लाठीचार्ज
करणा-यावर म्हणे घाला लाथ

"
अ"र - "जित"
कोणाचीही असो
काटा मात्र बरोबर फिरवतो
कारभार दिवसाचा असो
कि पहाटेचा
बारा मात्र बरोबर वाजवतो

ज्याने - त्याने फक्त
स्वतःचीच मिरवली
"
जरांगें" नी मात्र
सर्वांचीच जिरवली

No comments:

Post a Comment

 - विलास खैरनार           गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...