Tuesday, October 8, 2024

बंडखोरी


चोरलेल्या "धनुष्याने" कधीच शिकार होत नाही
"
कमळा" मावशीकडे परक्यांना जेवण मिळत नाही

काकांच्या "घड्याळा" तून वेळ आपली सांगता येत नाही
एका रात्रीत कधीच कोणाला मंत्री होता येत नाही

"
सामना" खेळणा-यावर वेळ उलटली
खेळा मध्येच गद्दारांची "सेना" निघाली

लेकराला संगतीला घेत "मशाल" पेटवली
"
मार्मिक" च्या पानांमधून कार्टून काढून टाकली

"
इंजिनला" धक्का देत मालक खूपच थकला आहे
मराठी अस्मिता जपता जपता
विषय भोंग्यांवर येऊन थांबला आहे

इटलीचा भाचा "पंजा" घेऊन यात्रा करतो आहे
उन्हा तान्हात बघा बिचारा कुठे कुठे भटकतो आहे

No comments:

Post a Comment

सर्वत्र शुकशुकाट होता कारण... एक एक वोट फक्त एका बाटलीत विकला जात होता विकासाचे तेच तेच धडे मिरवत लोकशाहीला हिणवत होता गल्ली गल्लीत भंडारा ह...