अपात्र
काल-परवा
विधानसभेच्या
भिंती रडत होत्या
धनुष्याला मिठीत घेत
चालु होता कायावाया
मुक्या बहि-याच्या
बाजारात...
न्याय व्यवस्थेच्या
विरोधात...
पण काय करणार
पन्नास खोक्यात एक घेतला
ते कसे अपात्र होणार
उद्धवांच्या हाती मग काय
मशालच येणार
नार्वेकरांच्या निकालात
नवं काहीच नव्हते
भिंतींचे पोपडे
ते फक्त सारवत होते
निष्ठा ना कोणा पक्षाशी
ना जनतेशी
पात्रता त्यांच्या रक्तातून गळून गेली
सत्तेच्या बाजारात बघा
लोकशाही कशी सडून गेली
No comments:
Post a Comment