Friday, October 25, 2024

बस स्थानकावरचा तो एक दिवस

  - विलास खैरनार

कॉलेज मधून धावपळ करत मी बस स्थानकावर पोहोचलो तर कळलं की गाडी एक तास उशिरा येणार आहे म्हणजे दुपारच्या एक वाजता. बस चुकली नाही एवढंच समाधान मनात होतं पण तिथे नजर कोणाला तरी सारखी शोधत होती. माझी नजर पूर्ण बस स्थानकावर फिरत होती. जागोजागी प्रवाशी उभे होते, कोणाच्या हातात बाजारांच्या पिशव्या तर बायांच्या डोक्यावर बोचके होते, समोरच साधारण साठीच्या पुढच्या नऊवारीतल्या दोन म्हाताऱ्या आजी आपसात गप्पा करत होत्या.
"काय शे तिना माहेरमा, तेसले खावन पडी जाईल शे आणि आटे तोरा अशी दखाडस एखादी राजानी पोर शे, तो ते नुसता बैल करी टाका तिनी," पहिली आजी तोंड वाकड करत म्हणाली
"आमनीनं तर नको विचारू, जशी काही सासरमा जे शे सगळं तिना बापनीच धाडेल शे, काय शे व माय आमनीन माहेर मा, निधी ना भंडारा, नी गावभर डोम्बारा" दुसरी आजी पदर सावरत म्हणाली



मी आजींच्या गप्पा व्यवस्थित ऐकू लागलो, त्या आपापल्या सुनाचे बद्दल बोलत होत्या, गप्पा ऐकून मनातल्या मनात हसू लागलो काही वेळात एका म्हाताऱ्या आजीचे लक्ष माझ्याकडे गेले अन तिने मला निरखून बघितले आणि लगेच गप्पा थांबून मला वेळ विचारला, मी हळूच सांगितले "सव्वा बारा वाजले आजी", पण दुसरी आजी माझ्याकडे डोळे वटारुन बघत होती, मी त्यांचे बोलन चोरून ऐकत होतो असं त्या आजीच्या लक्षात आले असावे म्हणून मी तिथून काढता पाय घेतला,
मी परत पूर्ण बस स्थानकावर नजर फिरवली ती मला कुठेच दिसली नाही, बस स्थानकाच्या अलीकडेच सरोदे न्युज एजेंशी जवळ दोन म्हातारे बाबा एकच न्युज पेपर एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकून वाचत होते अन त्यांच्या अगदी जवळच मुला-मुलींचा घोळका गप्पा करत स्वत:चे मनोरंजन करीत होते, न्युज एजेंशी जवळच भल्या मोठ्या निंबाच्या झाडाला पाट टेकून उभा राहिलो, माझा संयम आता सुटत चालला होता, मनात बैचेनी वाढत होती, मी माझे कान त्या मुलांकडे लावले, पण त्यांच्या गप्पा न सांगितलेल्या बऱ्या मी माझे कान बंद केले बाबांच्या पेपर मध्ये डोकवत पेपर वाचण्याचा प्रयत्न करू लागलो, तिथे पण न्युज पेपरमध्ये हेड लाईन दिसत नव्हत्या, मी व्यवस्थित निरखून पाहिले पण पेपरामध्ये फक्त कल्याण, मिलन तिथे सर्व आकडे आकडे दिसले, "अरे यार हे तर रतन खत्रीचे माणसं आहेत, ते बाबा जुगार खेळणारे दिसले, मी मनातल्या मनात म्हटले इथे सगळ 'ईय्या मोडीनं खिय्या करनं' काम चालू शे", तिथून हि मी काढता पाय घेतला आणि रस्त्याकडे नजर टाकली, बघतो तर काय ती अन तिच्या मैत्रिणी सोबत समोरून येत होत्या, दोघेही जोरजोरात हसत बस स्थानका मध्ये येत होत्या, मी जणू काही वाऱ्यासारखा उडू लागलो, पक्षासारखा डोलू लागलो, मन आनंदाने बहरून आले,

No comments:

Post a Comment

सर्वत्र शुकशुकाट होता कारण... एक एक वोट फक्त एका बाटलीत विकला जात होता विकासाचे तेच तेच धडे मिरवत लोकशाहीला हिणवत होता गल्ली गल्लीत भंडारा ह...