रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

वेदना


रान सारे पेटले
आसरा कुठे घेऊ
धगधगत्या आगेला
कवेत कसे घेऊ

फाटलेल्या ढगाला
कसे ठिगळं लावू
आभाळा एवढ्या वेदना
कुठे झाकुन ठेऊ

साचलेले दुःख
कसे व्यक्त करू
पेटलेल्या मनाला
कसे शांत करू

खंत फक्त हीच की
सुखाला जागाच नाही
मनावरच्या जखमांना
कुठेच सहारा नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा