Sunday, October 13, 2024

वळणाच्या वाटेवर


वळणाच्या वाटेवर
गाव माझं दिसलं
रस्त्यालगतच झुडपं
मला बघून हसलं
रानातलं पाखरु
माझ्या जवळ आलं
कानात माझ्या येऊन
काहीतरी कुजबुजल
माझ्या जवळच्या दगडावर
माकड येऊन बसलं
गावाकडच्या गप्पा
उगीच उधळतं बसलं
           - विलास खैरनार 

No comments:

Post a Comment

सर्वत्र शुकशुकाट होता कारण... एक एक वोट फक्त एका बाटलीत विकला जात होता विकासाचे तेच तेच धडे मिरवत लोकशाहीला हिणवत होता गल्ली गल्लीत भंडारा ह...