भारत नव्हता सशक्त,
तेव्हा निर्माण झाला एक देशभक्त,
भारत मातेचा हाच तो वीर होता,
इंग्रजाचा शिपाई असून ही
मनात हिंदुस्थानी गर्व होता,
गाय आणि डुक्कराची
चरबी इंग्रजानी चांगलीच
मिसळली होती,
हिंदुना चिडवण्याची
नितीमत्ता त्या इंग्रजांची होती,
काडतुस मध्ये चरबी
असणारी गोष्ट त्या
देशभक्ताला समजली
त्याच क्षणी, त्याच जागी
छावणीतील ब्रिटिश
अधिका-यावर गोळी झाडली,
नंतर.........!
त्या क्रांतिकारी देशभक्ताची
जणू जीवन शिदोरीच संपली
८ एप्रिल १८५७ रोजी
इंग्रजांनी भारत मातेच्या
यज्ञकुंडात पहीली आहुती
या थोर देशभक्ताची दिली,
सर्व भारतवासीयांच्या
डोळ्यातून अश्रू टपकले,
त्या थोर देशभक्ताच नाव
इतिहासाच्या पानात
सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले,
खरंच......!
हाच खरा देशभक्तीचा
जलवा होता,
तो भारत मातेचा सुपुत्र
मंगल पांडे होता,
- विलास खैरनार
No comments:
Post a Comment