साता जन्मांची
तुझ्या माझ्या
खास सोबतीची
-०९/०७/२०२२
........................................
मी सागराच्या किनारी सहज जाऊन बसलो
तो समोर लाढाचे उधळन करत होता
मी शांत पणे त्याच्या कडे बघत होतो
-----------------------------------
काहीच दिसतं नाही
धुक्यात सारं काही
नयन ही स्तब्ध झाले
उत्तर सापडत नाही
--------------------------------
उसका प्यार भी
आवारा बादल निकला,
गरजा कहीं और
बरसा कहीं और
- विलास खैरनार
--------------------------------
तुझं तुलाच माहिती
पण माझे खरे होते
तुच ओळखले नाही
माझं सर्वस्व वाहीले होते
-----------------------------
समुद्राला मिळण्याची तिला ओढ नसते
अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड नसते
जायचं असतं तिला आपल्याच मार्गाने
तिला थांबवायला हिम्मत कोणात नसते
---------------------------
वाट बघायची
"वादळ"
शांत होण्याची
त्यात फक्त
"आपली माणसं"
शोधण्याची
---------------------------
वादळांनी मला एकदा विचारलं
"तुला आमची भीती नाही का वाटतं"
मी हसतं उत्तर दिलं
"वादळांमध्ये राहून सवय झाली मला,
वादळांची"
-विलास खैरनार
----------------------------
तुमची निंदा सुरु झाली
म्हणजे समजायचं
तुमचा मार्ग योग्य आहे
----------------------------
स्वप्न आम्हास दाखवून
ते मत घेऊन गेले होते
सांगा तर मग निवडून
आल्यावर ते कुठे खपले ?
- विलास
----------------------------
स्वतःवरचं अतोनात प्रेम करणारी
माणसं वेडी नसतात.
त्यांना पक्कं ठाऊक असतं दुनिया कशी आहे.
---------------------------------
जगातील सर्वात सुखी माणूस तोच
जो एकटं जीवन जगायला शिकला
- विलास
----------------------------
मलाच मी तिच्यात शोधत होतो
ती तिच्याच दुनियेत रमली होती
----------------------------
No comments:
Post a Comment