पक्ष फोडणे म्हणजे
कांदा फोडण्यासारखं झालं
ओढून ताणून बुजगावणं
डोक्यावर बसवलं
गरीबीची जखम
अजून ओलीच आहे
अण् जातीचा खळगा
भरण चालू आहे
जो तो ज्याची त्याची
जात घेऊन पळाला
गरीब मात्र भाकरीच्या
तुकड्यासाठी तरसला
- विलास खैरनार
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment