Sunday, October 6, 2024

बदलापूर बलात्काराचे राजकीय वास्तव

        - विलास खैरनार 

     सत्ताधाऱ्यांनो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तुम्ही फक्त खुर्चीसाठी फोडा फोडेचे राजकारण केले, गृहमंत्री तुम्ही तर पूर्ण अपयशी ठरला आहात. तुम्ही आतापर्यंत फक्त आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे या पलीकडे काहीच नाही, अशा निर्लज्ज निष्क्रिय आणि बेकायदेशीर सरकार कडून काय अपेक्षा ठेवावी. आणि हो, आता लोकांनी खरंच बाहेर पडायला पाहिजे कारण महाराष्ट्राचा आता यु.पी. बिहार झालाय 
     बांगलादेशात जे काही चालले आहे त्याचे राजकीय भांडवल करणारे, आपल्या देशात राज्यात काय चालले आहे ते दिसत नाही का, कि फक्त हिंदू मुस्लिम करून राजकीय फायदा करून घेणार. जो तो आपापले मत कशी वाढतील ते बघतात.
    मी कोणत्याही पक्षाचा समर्थन करत नाही पण जे झालं ते सांगतोय, जर आज आंदोलन झालं नसत तर ती बातमी तिथेच दाबली गेली असती, वाईट याच वाटत की आज स्त्री मग ती कोणत्याही वयाची असो ती ना शाळेत, ना हॉस्पिटल , ना मंदिरात, ना रस्त्यावर कुठेच सुरक्षित नाही. 
    आंदोलनाशिवाय सामान्य जनतेला न्याय कधीच मिळत नाही आणि जे कोणी म्हणतात ना की शांततेचा आंदोलन करायचं, आंदोलन शांततेत झालं पण कोणीही दखल घेतली नाही म्हणून ते आंदोलन हिंसक झालं जर रेल्वे रोको झालं नसत तर आज ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राला कळलीच नसती आणि त्या दोन मुलींना न्याय मिळण्याची शक्यता नसती, अजून एक गोष्ट सांगतो जेव्हा रेल्वे रोको झाली तेव्हा एक एक्सप्रेस बदलापूर स्टेशन जवळ अडकली होती तेव्हा तिथे जवळ राहणाऱ्या रहिवासी यांनी त्यांना जेवण आणि पाणी देऊन त्यांची सेवा केली, आणि सत्ताधारी लाडकी बहिण योजनेचे ढोल वाजवत होते ,चुलीत घाला तुमच्या योजना जो पर्यंत अनाजीपंत सारखे मंत्री आपल्या महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत हे असेच चालू राहणार आहे.

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...