ध्यास माझा की तु रोज नव्याने सजावे
रोमांचित आसमंतात तु भरून जावे
रोमरोमांतुन हर्ष पहाटे तु दरवळावे
बिनधास्त अवखळ हास्य असावे
अंतरंगाचे भाव मुक्त जपावे
रोज नव्याने फक्त तुच नटावे
सकाळ आरंभी तुच फुलावे
भेटी लागी जीवा असे तु भेटावे
-विलास खैरनार
No comments:
Post a Comment