Monday, October 7, 2024

बाजीप्रभू देशपांडे

                      ( बाजीप्रभू देशपांडे यांची कहाणी "कथा-कथन" स्वरुपात लिहिली आहे ) 


दिनांक २ मार्च ४६६० या दिवशी गुढी पाडवा होता. शिवाजी राजानी नुसतेच मिरज सोडले आणि पन्हाळागडावर आले होते. पन्हाळगडावर शिवाजी राजाचे येणे याच्यामागे पण त्याच्या काही योजना होत्या. एकतर पन्हाळा स्वराज्याच्या कडेला होता. आणि पन्हाळा मोठा बिकट गड होता. पण एवढी योजना आखून ही शिवाजी राजे पन्हाळागडावर आटकलेच, खाली सिद्दी जोहरने गडाची इंज-इंज भूमी वेढ्यात गराडली गेली, तोफाचा मारा सुरु झाला. मारा तटापर्यंत पोहचत नव्हता, शेवटी फाजल खान बिन-अफजल खान मोहम्मदशाही इंग्रजाच्या तोफा घेऊन आला व लांब पल्ल्याच्या तोफा आग ओकू लागल्या सुदैवाने तोही मारा बेकार झाला. सिद्दी जोहरला आपलाच माणूस सामील झाला. त्याचे नांव .......! व्यंकोजी ऊफ एकोजी राजे ! शिवाजी राजेचे सख्खे सावत्र भाऊ शहाजी राजांच्या दुसऱ्या राणीसाहेबतुकाइंबाईसाहेबांचे चिरंजीव, दिवरे चिरंजीव ! आपल्या भावाची हार पाहण्यास उत्सुक असलेले विवेकशुन्य, आमचेच दळभद्री बांधव
पावसाळ्याचे दिवस सुरु झाले पण पावसातही गवताची झोपडी लावून सिद्दी जौहरने वेढा ढिला पडू दिला नाही. दिवसामागून दिवस जात होते गडावर राजे तीन महिन्यापासून अडकलेले होते बाहेर काय चालु आहे याची काहीच खंबर राजांना नव्हती ज्येष्ठ उलटून आषाढाचा महीना लागलाः होता. कर्नाटकच्या मोहिमेत गेळेळे नेताजी पालकर बाहेरून वेढ्यावर आकमण करुन वेढा फोडून टाकतील ही अशाही संपली होती. कारण सिद्दी जौहरच्या वेढ्या व्यतिरीक्त राखीव फौजेने नेताजी पालकर व सिदुदी हिलाल यांना पिटळून लावले होते. 
अखेर एक दिवस उजाडला तो दिवस होता. आषाढी महिन्यातील १२. जूले १६६० वार गुरुवार राजानी गडावरुन निसटण्याच्या बेत त्याना आखला. त्यादिवशी सकाळी -- सकाळी गंगाधरपंत वकील म्हणून गडावरुन उतरले व बिनशर्त शरणागतीचे पत्र (निरोप) सिद्दी जौहरला देऊन त्याला व त्याच्या फौजेला गाफिल करण्यात आले आणि त्याच रात्री शिवाजी राजा वेढ्यातून निसटले हेराच्या नजरेतून मात्र ते निसटू शकले नाहीत. सिद्दी मसूदने पाढलाग केला. काही अंतरावर शिवराय पकडले गेले, पाहता तर काय पालखीत शिवरायांसारखा वेष परीधान केलेला जाती म्हावी असलेला शिवा काशिद बसलेला होता. आणि याठिकाणी सिद्दी मसूद फसला, पण लक्षात येताच शिवा काशिदचे तुकडे --- तुकडे करण्यात आले
सिद्दी मसूदला फसवण्यासाठी शिवरायांच्या जागी पालखीत बसणे म्हणजे आपला अंत छसा होईल हे शिवा
काशिदला ‘माहीत होतं.......! तरी तो बसला, का? तर फक्त या स्वराज्यासाठी त्याने आपले अमर मरण पत्करले त्यांच्या
गावी नेवापूरत आजही दसऱ्याला लोक त्याच्या समाधीवर आधी सोने चढवतात मग दसरा साजरी करतात.
शिवा काशिदची फसवणूक लक्षात येताच सिद्दी मसूद पन्हाळाकडे गेले पाहता तर गडावर कोणाचा पत्ता नाही आता सिद्दीला जाणीव झाली होती कौ आता शिवाजी राजे आपल्या हातातून निसटले पण तरी सिद्दीने हार मानली नाही. सिद्दीला हे माहीती होते की राजे पन्हाळगडावरुन थेट विशाळगडावर जातील सिद्दीने राजाच्या पाठळाग सुरु केला. सिद्दीने मलकापूर मार्ग निघाला पण शिवाजी राजाचा मार्ग मात्र म्हसई पठार, चापेवाडी, खोतवाडी, अंबावाडी, पाटेवाडी हा होता. पण तरी देखील शिवाजी राजाची घोडदौड सुरुच होती, कारण पुढे जाऊन दोघाचे मार्ग एका ठिकाणी जाऊन मिळतील हे राजाना माहीती होते.
रात्रीची वेळ होती, त्यात पावसाळ्याचे दिवस, वरुन विजाचा कडकडात, जोराचा पाऊस, खाली चिखल—विखल झाला होता, घोड्याचे व सैन्याचे पाय चिखलात जात होते. आणि मागून सिद्दीचा पाठलाग सुरु होता. विशालगड अजून चार कास दूर होता.
शिवाजी राजासाठी रात्र जणू काही वैऱ्यासारखी चाल करुन येत होती. काय करावे राजाना काहीचं कळतं नव्हते...
अखेर.....! 
अखेर.....! गजापूरची घोडखिंड आली आणि शिवाजी राजाना एक आवाज आला. 
महाराज.....! जरा थांबवे.
शिवाजी राजा थांबले
घोड्यावरुन एक मावळा उतरला, डोळे त्याचे पानेदार त्यांच्या डोळेत चितेच्या नजरेची... धार दिसत होती. धिप्पाडासारखी छाती, आवाज निघावा तो एकाद्या सिंहाच्या डरकाळी सारखा, वाघाच्या ताकदीच बळ होत, त्यांच्या मनगटाळा मनगट लावण्याची हिंमत नव्हती कोणाची त्यांच्या कमरेला अडकलेली समशेर त्यांच्या पराकमाची साक्षी देत होती, असा हा लांबलचक पोलादी महापुरुष त्या घोडखिंडीला पण लाजवत होता. 
कृष्णाजी आणि बयोबाईच्या पोटी जन्म घेतलेला हा मराठ्याचा वाघ.


नांव होते ......! नांव होते बाजीप्रभू देशपांडे
बाजीनी पुढे येऊन राजाना मानाचा मुजरा केला.
महाराज..! विशालगड घोडखिंडीपासून चार कोस दूर आहे. रात्रीची वेळ आहे. जोराचा पाऊस पडत आहे. मागून सिद्दी मसूदचा पाठलाग सुरु आहे. महाराज ! मी काही मावळे घेऊन या घोडखिंडीत थांबतो तुम्ही गडावरुन जाऊन फक्त एक तोफेचा आवाज द्या.
मी भवानी मातेची शपथ घेऊन सांगतो. जो पर्यंत मळा तोफेचा आवाज येत नाही तो पर्यंत मी एका मोगलाला
सुध्दा ही घोडखिंड ओलांडू देणार नाही.
बाजींचे वाक्य पूर्ण होतं नाही होतं तेवढ्यात शिवाजी राजे म्हणाले.
नाही...! बाजी नाही मी तुम्हाला संकटात सोडून नाही जाणार
तितक्यात बाजी म्हणाले.
काळजी नसावी महाराज, हिंदूत्वासाठी आणि धर्मरक्षणासाठी रक्तल सांडण्याची रीत आहे या मगठ्याची, मी गेल्यावर माझ्यासारखे हजारो बाजी निर्माण होतील पण आज या रयतेला या हिंदू राष्ट्राला तुमची गरज आहे. बाजी काही तीनशे निवडक मावळे घेऊन थांबले, बाजींनी शिवाजी राजांना मुजरा केला. राजानी बाजींना मिठ्ठीत घेतले. राजानी बाजींचा निरोप घेतला आणि विशालगडाकडे निघाले. बाजीप्रभू देशपांडे काही निवडक तीनशे मावळे घेऊन घोडखिंडीत एखाद्या शिकारीला बसलेल्या वाघासारखी लपून त्या मुघलांची वाट पाहत होते, आणि शिवाजी राजे एका तुफाण्यासारखे गडाकडे जात होते, का? कशासाठी? फक्त या हिंदुत्वासाठी ह्या हिंदुराष्ट्रासाठी 
बघता.... बघता मुघल त्या घोडखिंडीत आले, आणि एकच हरहर महादेवाचा जयघोष सुरु झाळा, तलवारींचा सप सप आवाज येऊ लागला, सिद्दी मसुद पुर्णपणे घाबरला होता मुघलांना होत्याच नव्हत केल, काही क्षणातच .... काही क्षणातच ती घोडखिंड लालबुंद झाली. अनेक मुडके त्या लालबुंद झालेल्या घोडखिंडीत पडत होते त्यात काही आमच्या मर्द मराठ्या मावळ्याची ही होते. मुधलाची पिछेहाट होत होती. बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीच्या मुख्य कमानित उभे होते जाही मुधळ खिंड ओलांडण्याचा प्रयत्न करत हाता त्याचे मुंडके काही क्षणातच धडावेगळे करीत होत.पण बाजीच्या अंगावर पाठीमागून वार होत होते. पण बाजी मागे हटत नव्हते. शिवाजी राजे तिकड एखाद्या वाऱ्याच्या वेगासारखे विशाळगडावर जात होते. कारण राजांना काळजी होती त्या बाजीची राजांना गडावर जाऊल तोफेचा आवाज द्यायांचा होता. 
इकडे बाजींची समशेर सप सप वार करीत होती. अखेर..... अखेर नामर्द मुघलांनी पात कला. बाजींच्या पाठीमागून वार केला. आणि पाठीत घातलेली समशेर पुढे बाजींच्या छातीत निघाली. बाजीच्या पाठीमागूम आणि छातीमधून रक्त भळभळ निघू लागले बाजीच्या दोघी हाताच्या समशेर थडवल्या ते घुडग्यावर खाली वसले.
इतक्यात पऱ्हाळावरुन तोफेचा आवाज बाजीच्या कानांत येवून धडकला.
‘राजे गडावर पाहचले.......!
‘राजे गडावर पोहचले.......!
असे म्हणतं, बाजींनी दोघी हातातील तलवारी जमीनीवर टेकवत खाली बसले आणि आपले डोक तलवारी ठेवले. त्या लालबुध झालेल्या घोडखिडीत बाजी धारातीर्थी पडले. सर्वत्र शांता झाली, ती शांतता फक्त काही क्षणासाठी होती. काही वेळेतच पक्ष्याचा करकराट सुरु झाला, जोराच वादळ येवू लागलं आणि त्या घोडखिडीत आदळू लागलं, ढगात वीजांचा कडकडात सुरु झाला. जोराचा पाऊस सुरु झाला. ये सर्व पहाता असं वाटत होते की जणू काही ती घोडखिंड बाजीप्रभुना मानाचा मुजरा करीत होती.
बघता बघता बातमी राजेपर्यंत पोहचलो.
‘महाराज.....! बजी धारातीर्थी पडले महाराज.... बाजी धारातीर्थी पडले.
हे शब्द कानावर पडताच शिवाजी राजे तडकण सिंहासनवरुन उठले आणि म्हणाले.
‘माझा सिंहासारखा बाजी गला....!
‘माझा सिंहासारखा बाजी गेला.....!
असे म्हणतं, राजे स्वत:ला कसेबसे सवरत सिंहासनावर बसले.
घोडखिडीला पावन झालेले बाजी प्रभु देशपांडे, आज ही ती पावनखिड बाजीचा इतिहास मोठ्या गर्वाने सांगते आहे
असे होते आमचे शिवाजी राजे आणि असे होते त्याचे मावळे.
अशा या माझ्या हिंदू स्वराज्य साठी लढणारे माझे सर्व मराठी मावळ्याना माझा
‘मानाचा मजुरा......, मानाचा मजुरा.......!’

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...