रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

एक नजर

 


बस एक नजर तुझी
माझ्या नजरेत भिडावी
तुझ्या माझ्या मिलनाची
साक्ष द्यावी

माझ्या हास्याची जादू
तुझ्या चेह-यावर दिसावी
माझ्या शब्दांनी
तुझी ओंजळ भरून टाकावी

गीत माझं असावं
प्रित तुझी असावी
आभास तुझा
मित माझी असावी
फक्त
एक नजर तुझी असावी
- विलास खैरनार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा