शिक्षणाच्या बाजारात
मी अडकलो अन्
पुस्तकांच्या ओझ्याखाली
दबलो गेलो..
पदवीचे कागद घेऊन
दारोदारी भटकलो
कुठे आहे का काम ?
याचाच शोध घेत गेलो
नेहमीच वाटायचं
आकाशातल्या ताऱ्यासारखं
चमकत राहायचं,
पंख लावून पक्ष्यांसारखं
उंच उंच आकाशात उडायचं
पण काय करणार.........!
अजूनही आहे गरीबीची
झळ काळजात,
अन् मानगुटीवर बसलीय जात,
सापासारखी विळखा घालून,
आणि मी......
उभा आहे रस्त्याच्या कडेला,
लाल दिव्याच्या गाडीला सलाम करीत,
एका हातात पदवींचे कागद घेऊन,
दुस-या हातात पक्षाचा झेंडा घेऊन,
पक्षाच्या मालकाची वाट पाहत,
भिकाऱ्यासारखा घुसमळतोय,
का....?
कशासाठी......?
राष्ट्राच्या हितासाठी ?
की टीचभर पोटासाठी ?
No comments:
Post a Comment