रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

पाऊस आणि तु


बघ कसा असतो हा पाऊस
नभ कसं येत दाटून
मग कसं मोकळं होतं
जमीनीवर पडून

मग मोकळं दिसतं आकाश
निरभ्र आणि हालकसं
मग होतो नव्या
दिवसाचा आभास

अगदी तसच.....!
जस पहील्या भेटीला
वाटलं होतं
पाऊस आणि तु
सारखेच आहेत
कधी मनातून नाही जातं

मेघ दाटलं की
ह्दय दाटून येतं
पाऊस पडला की
तुला ही आठवीत असतं
-विलास खैरनार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा