रान सारे पेटले
आसरा कुठे घेऊ
धगधगत्या आगेला
कवेत कसे घेऊ
फाटलेल्या ढगाला
कसे ठिगळं लावू
आभाळा एवढ्या वेदना
कुठे झाकुन ठेऊ
साचलेले दुःख
कसे व्यक्त करू
पेटलेल्या मनाला
कसे शांत करू
खंत फक्त हीच की
सुखाला जागाच नाही
मनावरच्या जखमांना
कुठेच सहारा नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
-
बस एक नजर तुझी माझ्या नजरेत भिडावी तुझ्या माझ्या मिलनाची साक्ष द्यावी माझ्या हास्याची जादू तुझ्या चेह-यावर दिसावी माझ्या शब्दांनी तुझी ओंज...
No comments:
Post a Comment