तुझं माझं ते पावसात भिजणंं
पावसासोबत वाहून जाणं
उगीचच पावसाच्या सरीला
हातात झेलणं
आठवतं असेल तुला ही
तुझं ते पावसात नाचणं
नाचताना उगीचच मला
तुझ्या मिठीत घेणं
आठवतं असेल तुला ही
तुझं ते आकाशाला हात
लावण्यासाठी उड्या मारणं
उड्या मारताना उगीचच
मला धक्का मारणं
आठवतं असेल तुला ही
तुझं ते डोळ्यातून येणारे
अश्रू पावसात लपवणं
दूर करून मला भरगच्च
अश्रुंचा पाऊस पाडणं
- विलास खैरनार
No comments:
Post a Comment