ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची
बघा कशी ओढा ताण झाली
गटारी सोबत,
गल्ली बघा किती घाण झाली
जो तो आपल्याचं
रुबाबाच्या गोष्टी करतो
पेरूण ठेवलं म्हणतं,
उगवण्याच्या गोष्टी करतो
यात्रेच्या तमाशात
पोरांची प्रगती
गावाच्या लोकांना
गावाच्याच कुत्र्यांची भीती
आले गेले किती तरी
गावाची अवस्था तसीच
वस्तीवरचा पोरगा बघा
अजून ही उपाशीच
No comments:
Post a Comment