जेव्हा मी विझलो
तेव्हा काळोख झाला
सभोवतालचा अंधार
माझ्याकडे पहात हसला
बाजूला करत
मनातल्या भीतीला
माझ्यातला उजेड पुढे सळसळला
काळोखाशी दोन हात करायला
तेव्हा उभा ठाकला सैतान
अंधाराच्या सहारी
तोच होता उजेडाचा मारेकरी
मग मी ही पेटून उठलो
अग्नीच्या साक्षीने
काळोखाचा नायनाट करायला
क्रांतीची मशाल पेटवायला
स्वतःला पेटवत
अंधकाराला मिटवत
- विलास खैरनार
No comments:
Post a Comment