एक बरं झालं
मी राजकारणात गेलो नाही
नाहीतर....
पडला असता मुडदा
त्या घोटाळेबाजांचा
अण्
जागवल असत संसदेच्या भिंतींना
केले असते आंदोलन
अन्यायाच्या विरोधात
मग केला असता प्रहार
जातीवर
पेटवली असती मशाल
त्यांच्या बुडाखाली
जातीयतेची...
पण ते बरंच झाल
मी राजकारणात गेलो नाही
- विलास खैरनार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा