शाळेत असतांना पिक्चर
बघण्याची सवय जडली,
त्या हिरो सारखी आपली
ही हिरोईन असावी अशी
मनाला ओढ लागली
वर्गात तशी मी एक शोधून ठेवली
तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठी
चेह-यावर खूप पावडर फासली
पावडर लावून आल्यामुळे सरांनी
कुत्र्या सारखी धुलाई केली
सरांना माझ्या पावडर मागच्या
भावना समजल्याच नाही
आणि माझ्या प्रेमाचा सुगंध
तिच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही
- विलास खैरनार
No comments:
Post a Comment