मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

लाडकी बहीण



सासूबाई चा रुबाब
म्हणजे एक बहाणा आहे
कारण सूनबाई सरकारच्या
लाडक्या बहीणा आहेत

सासूबाई अण् नवरा आता
हैराण झाले आहेत
बारी बारीने बरेच कामं आता
यांच्या वाटेला आले आहेत

काहीही झालं तरी लाडक्या बहीणीच्या  
नव-याची घरात चुप्पीच आहे
सरकारची विरोधकांना 
पोटात ही एक बुक्कीच आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा