बुधवार, १९ मार्च, २०२५

नागपूरात झालेल्या दंगलीचे जबाबदार कोण ?

  - विलास खैरनार

नागपूरमध्ये पुन्हा जातीय तेढ निर्माण करण्याचा खेळ सुरू झालाय! आणि हा खेळ खेळणारे काही ठराविक लोकच आहेत - जेवढं रक्त सांडेल, तितकं त्यांच्या राजकीय स्वार्थाला खतपाणी मिळतं. औरंगजेबच्या नावाने आंदोलन करून बाबा ताजुद्दीन यांच्या चादरीचा अपमान करणारे हे कोण? आणि का? ह्यांचा उद्देश काय? धार्मिक भावना दुखावून, समाजात विष पसरवणं हाच काय "संस्कृती रक्षणाचा" मार्ग उरलाय का?


ही नागपूरची संस्कृती आहे का? महाल भाग म्हणजे नागपूरचं हृदय, आणि त्यात हे द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय! आज हे सुरू झालंय, उद्या तिथं आणखी काही पेटवलं जाईल. हे लोक कोणत्याही एका धर्माचे हितचिंतक नाहीत - ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी, लोकांच्या भावना विकण्याचं काम करतायत. नागपूरकरांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, ही आग आपल्या दारात लावली जातेय, आणि तिच्या ज्वाळा वाढतील तेव्हा हे सगळे "संस्कृती रक्षक" लांब पळतील! त्यांना ना इथल्या हिंदूंचा खरा फायदा करायचा आहे, ना मुसलमानांचा -त्यांना फक्त सत्ता हवी आहे! आता नागपूरचं सामाजिक शांतता वाचवायची की हे सगळं शांत पाहायचं, हा निर्णय नागपूरकरांनी घ्यावा!

चोरांचे सरकार आहे ... दंगलखोरांचे सरकार आहे
आमदार चोरले
जनमत चोरले
पक्ष चोरले
न्याय चोरला
भ्रष्टाचाराच्या फायली दाखवत , तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन, विरोधी पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करुन आपल्यासोबत घ्यायचे आणि सत्तेत बसून सरकारी तिजोरी व मालमत्ता लुटायची हा खेळ दिवसाढवळ्या सुरु आहे .
जोपर्यंत बहुसंख्य निगरगट्ट आणि बावळट जनता सुधारणार नाही , कणखर विरोध दर्शविणार नाही तोपर्यंत हे असेच बघावे लागणार यात तिळमात्रही शंका नाही .

समाजात निर्माण होणाऱ्या दंगली, जातीय तेढ आणि हिंसाचार हे सहसा नियोजित आणि हेतुपूर्वक घडवले जातात. यामागे काही विशिष्ट गट, जात किंवा धर्म आपल्या स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात. मराठा समाजाने अशा प्रकारच्या कटकारस्थानांना बळी न पडता, संयम आणि शहाणपणाने विचार करून पावले उचलली पाहिजेत.

मराठा समाज हा स्वाभिमानी असून, ऐतिहासिकदृष्ट्या समाजहितासाठी नेहमीच पुढे राहिला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांनी अशा हिंसाचारात न पडता, आपली ताकद संघटनेत आणि कायदेशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढण्यात खर्च केली पाहिजे.

या मुद्द्यावर काही ठळक बाबी:
1. दंगली हेतुपूर्वक घडविल्या जातात – काही विशिष्ट गट समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अशा घटना घडवतात.

2. मराठ्यांनी यामध्ये न पडणे हेच हिताचे – दंगलीत सामील झाल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

3. संघटित आणि शांततामय लढा अधिक प्रभावी – कायद्याच्या मार्गाने आणि राजकीय सामर्थ्याने प्रश्न सोडवता येतो.

4. आरक्षणविरोधी गट स्वतः सक्षम आहेत – त्यांना मराठ्यांकडून सहानुभूतीची गरज नाही.

अशा परिस्थितीत मराठा समाजाने आपले मुख्य उद्दिष्ट – आरक्षण आणि सामाजिक प्रगती – याकडे लक्ष केंद्रित करावे. समाजविघातक तत्वांपासून सावध राहून, आपल्या हक्कांसाठी संविधानिक मार्गाने लढणे हेच शहाणपणाचे ठरेल.

मातृभूमीच्या संरक्षणासाठी ज्यांनी पिढ्यान पिढ्या घातल्या त्यांना धर्माचे संवर्धन, संरक्षण करण्याची चांगली समज आहे.

"३१८ वर्षांपूर्वी मेलेल्या औरंगजेबावर राजकारण करणार्‍यांसाठी काही विचार"

औरंगजेब १७०७ साली मेला. या गोष्टीला ३१८ वर्ष झाले पुढे त्याच्या मृत्यूनंतर भारत बदलला, पुढे अनेक साम्राज्ये आली आणि गेली, शेवटी देश स्वतंत्र झाला. पण २०२५ मध्येही जर काही लोक औरंगजेबाच्या नावावर समाजात तेढ निर्माण करत असतील, तर त्यांनी स्वतःच्या राजकीय अपयशावर विचार केला पाहिजे.

विकासाचा मुद्दा टाळण्यासाठी इतिहासाची धूळ उकरून काढणाऱ्या नेत्यांना काही प्रश्न:

महागाईवर उपाययोजना आहेत का?
तरुणांना नोकऱ्या देण्याची योजना आहे का?
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का?
रस्ते, पाणी, वीज यावर लक्ष दिलं का?
देशाला औरंगजेबाच्या भुताची नाही, तर उत्तम आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेची गरज आहे!
राजकारण विकासावर करा, इतिहासावर नव्हे!

सर्व धर्मीयांनी एकत्र या आणि षडयंत्र मोडून काढा .
मनुवाद्या॑चे कुटील कारस्थान संपवा आणि शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा