काल-परवा
विधानसभेच्या
भिंती रडत होत्या
संविधानाला मिठीत घेत
चालु होता कायावाया
मुक्या बहि-याच्या
बाजारात...
न्याय व्यवस्थेच्या
विरोधात...
पण काय करणार
पक्षात सर्वच त्यांची नातीगोती
ईडी, घोटाळेबाज
सर्वच त्यांच्या हाती
निष्ठा ना कोणा पक्षाशी
ना जनतेशी
पात्रता त्यांच्या रक्तातून गळून गेली
सत्तेच्या बाजारात बघा
लोकशाही कशी सडून गेली
अमुक पक्षाचा नेता,
टमुक पक्षाच्या वाटेवर
कोण कुठल्या पक्षात,
कोण कोणाच्या बॅनरवर
सोयीनुसार पक्ष बदलणं
यात काहीच नाही नवलं
नाहीतर...!
ईडी किंवा घोटाळ्याच
भूत तुमच्या मानगुटीवर बसेल
आता सर्व घोटाळ्याचे
पाप सर्वांना माफ आहे
संगतीला घेऊन
त्यांच्यासाठी कोणते झुकते माप आहे
कोणाच्या हातात
नेमका कोणाचा लगाम आहे
कोणाची गळती
तर कोणाचा पेरणी हंगाम आहे
गांधी टोपी उतरवून
गळ्यात भगवे उपरणे घातले
तर तुम्ही भगवाधारी होत नाही.
परक्या घरी गेल्यावर आपल्यापणाची
वागणूक कोणालाच मिळत नाही.
- विलास खैरनार
No comments:
Post a Comment