-विलास खैरनार
सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोठा बदल होताना दिसत आहे, कारण २०१९ मध्ये जर आपण बघितलं तर भाजप स्वत: च्या हिंमतीवर उभा होता पण पाच वर्षात आजचा महाराष्ट्र आपण बघतोय तर राजकारणाची भाजपची आजची परिस्थिती वेगळी आहे.
स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून कशी घेता येते हे कळण्यासाठी काँग्रेसला साठ वर्ष लागले आणि हेच भाजपने दोन दशकात करून दाखवले. देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाची संपूर्ण ताकद असताना सुद्धा भाजपची आताची जी काय अवस्था झालेली आहे ती विरोधकांनी केलेली नाही ही त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक अन्य कोणत्याही पक्षांपेक्षा भाजपासाठी अवघड जाणार आहे.
भाजपवाले दिल्लीत बसून महाराष्ट्राचे राजकारण चालण्याचा प्रयत्न करत होते पण हा प्रयन्त त्यांचा फसला आहे हे दिसत आहे. पक्ष ताकदीवरती याला फोडायला घ्या त्याला फोडायला घ्या, पण तुम्ही तुमच्या पक्षातील नेत्यांच्या ज्या काही भावभावना आहेत त्या समजून घेतल्यात हे महत्त्वाचे आहे. 2019 ला 105 जागा मिळाल्यामुळे भाजपाला जो प्रचंड गर्व तयार झाला, त्याच्यामुळे शिवसेना फोडली आणि नंतर अजित पवार फोडले तिथून सुरू झाला सर्व खेळ, शिवसेना आणि भाजपची युती असतांना भाजप नेहमीच मोठ्या भावाची भूमिका निभावत होता. मग ते हिंदू राष्ट्रासाठी असेल किंवा भाजप सरकारचे स्थैर्यासाठी असेल नंतर भाजपाने जे फोडा फोडीचे राजकारण सुरु केले आणि भाजपात जो बदल होत गेला त्यामुळेच मित्र पक्ष प्रचंड दुखावलेला आहे तो म्हणजे शिवसेना, आता त्याची युती नाही तो भाग वेगळा आहे.
काँग्रेसचे काय करायचं राष्ट्रवादीचं काय करायचं यापेक्षा भाजपकडे आता समोर आव्हान आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काय करायचं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले पण त्यांचा मोठेपणा काकांच्या मुळे हे नाकारताना येत नाही.
महाराष्ट्रात सध्या विकासाचे कामं कमी आणि पक्ष अंतर्गत मतभेद जास्त दिसताय अजून हि वेळ गेली नाही आता तरी नेत्यांनी लोकांची मानसिकता ओळखून घेतली पाहिजे
No comments:
Post a Comment