रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

शब्द


कविता लिहितांना
मनात विचारांची बहर येते
ह्दयाच्या दरवाजावर
शब्दांची थाप पडते

शब्दांच पाखरू
मनात असं झेप घेतं
विचारांच्या वादळाला
जसं आकाश उडवून नेतं

वा-या सारखे येतात
मनाला छळत बसतात
जाताना मात्र कविता
तयार करून जातात
-विलास खैरनार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा