वळणाच्या वाटेवर
गाव माझं दिसलं
रस्त्यालगतच झुडपं
मला बघून हसलं
रानातलं पाखरु
जवळ माझ्या आलं
कानात येऊन
काहीतरी कुजबुजलं
जवळच्या दगडावर
माकड येऊन बसलं
गावाकडच्या गप्पा
उगीच रंगवत बसलं
- विलास खैरनार
१/१२/२०२१
- विलास खैरनार गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडपच नाही… गाव म्हणजे माणसं! आणि या माणसांचा गंध, त्यांच्या स्वभावाचा गोडवा, त...
No comments:
Post a Comment