जेव्हा कोणी आपलं नसतं
तेव्हा आपल्या सोबत असते
ती कविता !
सगळं दुःख विसरायला लावते
ती कविता !
जगण्यासाठी उर्जा देते
ती कविता !
आपल्या भावनांची साक्षी देते
ती कविता !
स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते
ती कविता !
कोणाचा तरी श्वास बनते
ती कविता !
- विलास खैरनार
२९/०९/२०२०
No comments:
Post a Comment