रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

उद्रेक


उद्रेक भावनांचा
मनात दडलेल्या कल्लोळाचा...
उद्रेक विचारांचा
समाजातल्या अस्मितेचा...

तेथील दडलेल्या
संस्कृतीचा....
माणसांनी पेरूण
ठेवलेल्या अंतराचा...

उद्रेक जल्लोषाचा
मेलेल्या माणूसकीचा...
संसदेच्या अर्थसंकल्पातील
मांडलेल्या गरीबीचा...

उद्रेक भक्तीचा
माणसातल्या अंधकाराचा...
अंधारलेल्या संसाराचा
माणसाच्या माणूसपणाचा...
-विलास खैरनार
०१/०९/२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा