रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

तुला पण असंच होतं?




फक्त आठवण आली तरी
मन वा-यासारखं डोलतं
तेव्हा हवाहवासा वाटतो एकांत
मग मनाला वाटतं
भेटावं एकदा तरी
मन तेव्हा सैरभैर होतं
अट्टाहास करत
तुझा आणि तुझ्या आवडींचा
अस वाटतं की
सतत तुझ्याशी बोलतं रहावं
पण काय बोलावं
काहीच सुचत नसतं
काळीज तेव्हा फक्त धडधडतं
सांग ना
तुला पण असंच होतं...?
-विलास खैरनार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा