आयुष्याच्या मध्यावर
उभा राहून बघतो माघारी
जीवनाच्या गराड्यात सापडलो
पुढे जाण्याची भीती
मागे सरकलो तर बनेल
जिंदगीचा शिकारी
थांबलो तिथेच तर
म्हणेल कोणी भिकारी
योग्य हेच की चालत राहणं
संकटाशी लढत राहणं
लढताना हरलो जरी
हरण्याची खंत नाही
संघर्ष माझा ध्येयासाठी
माझ्या लढाईचा अंत नाही
पुन्हा उठेल मी युध्दासाठी
शांत बसायला मी काही संत नाही
-विलास खैरनार
२९/१०/२०२०
No comments:
Post a Comment